tandav web series

‘तांडव’ ही वेबसीरिज(tandav webseries) ॲमेझॉन प्राईमवर(amazon prime) १५ जानेवारीला रिलीज झाली आहे. मात्र रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या वेबसीरीजवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ट्विटरवर #BoycottTandav ट्रेंड होऊ लागले आहे.

‘तांडव’ ही वेबसीरिज(tandav webseries) ॲमेझॉन प्राईमवर(amazon prime) १५ जानेवारीला रिलीज झाली आहे. मात्र रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या वेबसीरीजवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ट्विटरवर #BoycottTandav ट्रेंड होऊ लागले आहे. अंकिता ठाकूर हीने या वेबसीरिजमधील आक्षेपार्ह सीन ट्विटरवर शेअर केला आहे.

अंकिता आणि अन्य नेटकऱ्यांच्या मते ज्या पद्धतीने या वेब वेबसीरिजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे , ते अजिबात स्वागतार्ह नाही. वेबसीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये जीशान अय्युब शंकराच्या वेशात दिसतात. या सीनमध्ये शंकरावर टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सीनमुळे तांडव वेबसीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी ट्विटरवर होत आहे.#BoycottTandav  हा ट्रेंड वाढत आहे.

याशिवाय काहींनी या वेबसीरिजमध्ये हिंदू विरोधी भूमिका मांडल्याचेही म्हटले आहे.

एकूण तांडव या वेबसीरिजवरून नवे वादाचे तांडव सुरु झाले आहे, असेच म्हणावे लागेल.