antim the final truth

‘अंतिम: द फायनल ट्रुथ’(Antim : The Final Truth)च्या ‘विघ्नहर्ता’ या पहिल्या गाण्याच्या टीझरचे (Vighnaharta Song Teaser Release) अनावरण करण्यात आले आहे.

    बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’(Antim : The Final Truth)च्या ‘विघ्नहर्ता’ या पहिल्या गाण्याच्या टीझरचे (Vighnaharta Song Teaser Release) अनावरण करण्यात आले आहे. उत्सवी वातावरणासाठी हे एकदम परफेक्ट गाणे आहे. हा टीझर गणपती उत्सवाची भव्यता दाखवणार आहे.

    ‘विघ्नहर्ता’ हे गाणे ऊर्जा आणि भव्यता असलेले एक परिपूर्ण फेस्टिवल सॉन्ग आहे. गणपती उत्सवाचे सार या टीझरमध्ये सामावले असून हा टीझर म्हणजे हा ट्रॅक कसा आहे याची परफेक्ट झलक आहे. गाण्याच्या या अनोख्या टीझरसोबत चित्रपटाबाबतचा उत्साह आधीपेक्षा अनेक पटीने वाढला आहे.

    या छोट्याशा टीझरमधून, आपल्याला सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आकर्षक आणि मोहक अदा पाहायला मिळत असून अपेक्षांना आणखी उच्च स्तरावर घेऊन जातो.

    ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असून हा चित्रपट सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.