राखी सावंतवर बिग बॉस मेहेरबान, गिफ्ट म्हणून दिली २५ लाखांची कार, VIDEO व्हायरल!

‘इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका कारजवळ उभी आहे. ‘बिग बॉसने मला २५ लाख रुपयांची कार दिली आहे’ असे राखी बोलत आहे.

  बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी चर्चेत असते. नुकताच राखी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. तिने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन देखील केले आहे. आता राखीला बिग बॉसने गाडी गिफ्ट म्हणून दिली असल्याचे समोर आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  ‘इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका कारजवळ उभी आहे. ‘बिग बॉसने मला २५ लाख रुपयांची कार दिली आहे’ असे राखी बोलत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  ‘बिग बॉस १४’च्या घरात राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एण्ट्री केली होती. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे राखीने फिनालेमध्ये म्हटले होते. काही दिवसांपूर्वी राखीच्या आईला कॅन्सर झाल्यामुळे मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राखीला सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खानने यांनी आर्थिक मदत केली होती.