tarri 1 new

या प्रकरणी निर्माता अमोल लक्ष्मण कागणे (२९, रा. जांभूळकर चौक, वानवडी पुणे) यांनी फिर्याद दिली असून आरोपी विक्रम धाकतोडे (३८, रा. राहुलनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी काळात आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता, निर्माता अमोल कागणे यांना ३० लाखांचा गंडा घालून फसवणूक करण्यात आली आहे. चित्रपट व्यवसायात सहभागी करून घेण्याचे आदेश दाखवून निर्माता अमोल कागणेला २९ लाख ५५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी मंगळवार (दि.१२) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विक्रम यांना हिंजवडी पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतलय.

या प्रकरणी निर्माता अमोल लक्ष्मण कागणे (२९, रा. जांभूळकर चौक, वानवडी पुणे) यांनी फिर्याद दिली असून आरोपी विक्रम धाकतोडे (३८, रा. राहुलनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमोल कागणे हे चित्रपट निर्माते असून ‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘वाजवूया बँड बाजा’, ‘परफ्यूम’,  ‘बेफाम’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. तर आरोपी विक्रम धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतात.

जबरदस्त ऊर्जा असलेला, काहीही करण्याची धमक असलेला तरुण म्हणजे ‘टर्री’. मराठीतला डॅशिंग स्टार ललित प्रभाकर ‘टर्री’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून लवकरच इतर कलाकारांची निवड होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं ‘टर्री’ची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. महेश रावसाहेब काळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.