अभिनेता विक्रांत मेस्सी करणार ‘या’ स्टार किड्सबरोबर रोमान्स!

निर्माते रमेश तौरानी टिप्सच्या बॅनरखाली पवन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात सारा आणि विक्रांत यांची वर्णी लागली आहे.

    आज एकीकडं सारा अली खान आपल्या आगामी प्रोजेक्टसमध्ये बिझी आहे, तर दुसरीकडं विक्रांत मस्सीही विविधांगी व्यक्तिरेखा साकारत लाइमलाईटमध्ये आला आहे. सध्या तरुणाईचे आवडते असलेले तारा आणि विक्रांत हे दोन कलाकार लवकरच एकत्र झळकणार आहेत. लॅाकडाऊनमुळं प्रदर्शित न होऊ शकलेल्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पवन कृपलानी आपल्या आगामी प्रोजेक्टकडे वळले आहेत.

    निर्माते रमेश तौरानी टिप्सच्या बॅनरखाली पवन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात सारा आणि विक्रांत यांची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं शीर्षक ‘गॅसलाईट’ असं ठेवण्यात आलं असलं तरी अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर एक नवी जोडी येणार आहे. सारा-विक्रांत या नव्या जोडीची केमिस्ट्री पहाणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. आॅक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.