शाहीर शेखने मिठीत घेताच हिना खानची झाली अशी अवस्था, Video होतोय व्हायरल!

हिना खान आणि शाहीर शेख यांचा आगामी म्यूझिक अल्बम ‘बारिश बन जाना’च्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान थरथर कापत आहे.

  अभिनेत्री हिना खान नेहमीच याना त्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या ती एका तीने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.  या व्हिडीओमधून ती स्वतःवर कशा पद्धतीने टॉर्चर होतंय हे दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेता शाहीर शेख सुद्धा दिसतोय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by HK (@realhinakhan)

  हिना खान आणि शाहीर शेख यांचा आगामी म्यूझिक अल्बम ‘बारिश बन जाना’च्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान थरथर कापत आहे. फक्त हिना खानच नव्हे तर शाहीर शेखची सुद्धा अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दोघांची अवस्था पाहून क्रू मेंबर्स त्यांना ब्लॅंकेटने झाकताना दिसून आले. ही महिला तिच्या आगामी अल्बम सॉंगची दिग्दर्शिका आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by HK (@realhinakhan)

  हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री हिना खानने एक कॅप्शन सुद्धा लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “अशा प्रकारे सगळ्यात किमान डिग्री तापमानात बर्फाळ पावसात आमच्यावर टॉर्चर झालं आणि इतक्या सुंदरतेने या महिला पूजा सिंह गुजराल यांनी थंड टॉर्चरला ‘बारिश बन जाना’ हे नाव दिलं. मला माहितेय हे पाहणं मनाला सुख देणारं आणि रोमॅण्टिक वाटणारं आहे. पण यासाठी खूप सारी मेहनत आणि प्रयत्न लागतात आणि शेवटला हे प्रयत्न सार्थकी लागतात. हो ना शाहीर शेख…यापुढे आणखी बरेच BTS व्हिडीओज पहायला मिळणार आहे. रिलीज होतोय येत्या ३ जून रोजी.”

  अभिनेत्री हिना खान आणि अभिनेता शाहीर शेख यांचा ‘बारिश बन जाना’ हा नवा अल्बम सॉंग भेटीला येतोय. याच गाण्याची शूटिंग काश्मिरमध्ये झाली आहे. या अल्बम सॉंगचा फर्स्ट लूक २९ मे रोजी रिलीज करण्यात आला होता. यात दोघांची घट्ट बॉन्डिंग पाहून त्यांच्या नव्या अल्बम सॉंगसाठी फॅन्स उत्सुक झाले आहेत.