virushka fake photo

विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात.  पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं दिसत आहेत. विरूष्काच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट- अनुष्काच्या घरात काल कन्यारत्न आले. विराटने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. त्यानंतर क्रिडाक्षेत्रा असो वा कलाविश्व सगळ्यांनीच विरूष्कावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. आता विरूष्काच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी आणि तिचे नाव ऐकण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात.  पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं दिसत आहेत. विरूष्काच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तो फोटो विरूष्काच्या मुलीचा नाही तर…

हा फोटो कमालीचा चर्चेत आला आहे. परंतु, स्टार कपलच्या मुलीचा हा खरोखर पहिला फोटो आहे का?, असा प्रश्नही अनेकांना पडला होता. मात्र, फोटो गुगलवर सर्च केला असता, तो स्टॉक फोटो असल्याचे लक्षात येतं. त्यामुळे हा चर्चित फोटो विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचा नाही. तिच्या फोटोसाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

तैमूर होऊ देणार नाही

काही दिलसांपूर्वी अनुष्काने एका मुलाखतीत सांगितलेलं की, बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवणार, आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही.