विराट उत्तम बाबा आहेस, विरूष्काच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया!

या फोटोत अनुष्काने वामिकाल उचलून घेतल्याचं दिसतंय. तर विराट कोहली सर्व बॅगस् सांभाळत आहे. तर या फोटोंमुळे विरुष्काचं कौतुकही होतंय.

  विरूष्काच्या घरी वामिकाचा जन्म झाल्यापासून ते दोघेही तीला पुर्ण वेळ देत आहेत. विरूष्काने त्यांच्या लेकीला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतच विराट कोहली आणि अनुष्का शर्माला वामिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलंय. विरुष्काचे बाळासोबतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  या फोटोत अनुष्काने वामिकाल उचलून घेतल्याचं दिसतंय. तर विराट कोहली सर्व बॅगस् सांभाळत आहे. तर या फोटोंमुळे विरुष्काचं कौतुकही होतंय. दोघही चांगलं पालकत्व करत असल्याचं म्हंटलं जातंय. विरुष्काने ठरवल्याप्रमाणे कोणत्याच फोटोत वामिकाचा चेहरा दिसत नाहिय. तर विराटने सर्व बॅगस् सांभाळत एक उत्तम वडील होण्याचं कर्तव्य पार पाडलंय असं नेटकरी म्हणतायत.

  इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी अनुष्का विराट कोहलीसोबत अहमदाबादला गेली होती. अहमदाबादवरुन पुण्याला परतत असताना विरुष्काच्या कुटुंबाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी तसचं काही इतर काही मीडिया फोटोग्राफर्सनी विरुष्काचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.