anushka sharma

वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही. आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय समजत नाही तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या वर्षी आईबाबा बनले. त्यांना ११ जानेवारी २०२१ ला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. वामिकाचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. पण लेकीच्या जन्मा आधीच आपल्या बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवणार असल्याचं विराट आणि अनुष्काने जाहीर केलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  अशातच एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा कधी दाखवणार, असा प्रश्न विचारला. ‘वामिका’चा अर्थ काय होतो, ती कशी आहे आणि मी तिला पाहू शकतो का, असे चाहत्याने विचारले. त्यावर विराटने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. विराट म्हणाला, वामिका हे दुर्गामातेचे नाव आहे. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही. आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय समजत नाही तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  विराटचा हा निर्णय योग्य असल्याच्या कमेंट अनेक जणांनी इन्स्टाग्रामवर केल्या आहेत. विराट आणि अनुष्का दोघांनी आपल्या मुलीचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या खासगी आयुष्यात माध्यमांनी ढवळाढवळ करू नये, असे आवाहनही त्यांनी यापूर्वीच केलेले आहे.