anushka

विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात.  पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं दिसत आहेत. विरूष्काच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट- अनुष्काच्या घरात काल कन्यारत्न आले. विराटने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. त्यानंतर क्रिडाक्षेत्रा असो वा कलाविश्व सगळ्यांनीच विरूष्कावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. आता विरूष्काच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी आणि तिचे नाव ऐकण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात.  पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं दिसत आहेत. विरूष्काच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 विरूष्काच्या लेकीचं नाव अन्वी

अनुष्का व विराट यांनी आपल्या लेकीचे नाव अन्वी ठेवल्याच कळतय. अनुष्का आणि विराट या नावाला मिळून अन्वी असे नामकरण करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप विरूष्काने अद्याप अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा केलेली नाही. अन्वी म्हणजे लक्ष्मी. विरूष्काच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि त्याअर्थाने हे नाव अगदीच समर्पक आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)