‘विसर्जन’ करणार ‘नवी सुरुवात’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

'विसर्जन' या टायटलसोबत देण्यात आलेली 'एक नवीन सुरुवात' ही टॅगलाईन विचार करायला भाग पाडणारी आहे. थोडक्यात काय तर 'विसर्जन' या चित्रपटाचं टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.

    कोरोना आणि त्यामुळं झालेल्या लॅाकडाऊनच्या जाळ्यात अडकलेल्या ‘ईमेल फिमेल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विसर्जन’ असं लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे चेहरे या टीझरमध्ये पहायला मिळतात. हाती शस्त्र आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून हा सामान्य माणूस, राजकारण, गुंडशाही आणि सुरक्षा व्यवस्थेचा डाव या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.

    ‘विसर्जन’ या टायटलसोबत देण्यात आलेली ‘एक नवीन सुरुवात’ ही टॅगलाईन विचार करायला भाग पाडणारी आहे. थोडक्यात काय तर ‘विसर्जन’ या चित्रपटाचं टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात गणेश यादव, अनंत जोग, सुरेश विश्वकर्मा, स्वरदा जोशी, विजय गिते, अनिल धकाते, विजय आंदळकर, सिद्धार्थ बद्दी आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

    सचिन धकाते आणि अलकनंदा जोशी यांनी कांतानंद प्रोडक्शन आणि श्रीवेद प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुदर्शन पांचाळ यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, सिनेमॅटोग्राफी मयूरेश जोशी यांची आहे. निलेश पतंगे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.