shaharukh khan with sister

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे जबरा फॅन फॉलोइंग सगळ्यांनाच माहितेय. शाहरुख खान आणि त्याच्या कुटूंबाची अनेक थ्रोबॅक छायाचित्रे सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. शाहरूखच्या चाहत्यांना त्याचे हे थ्रोबॅक फोटो खूप आवडतात. अलीकडेच शाहरुख खानचे आणखी एक जुने चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण या चित्रात शाहरुखपेक्षा बाजूला उभी असलेली मुलगी कोण आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये जास्त आहे.

चित्रपट निर्माता आणि अभिनेता विवेक वासवानी आणि शाहरुख खान यांचे खूप जवळचे नाते आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. शाहरुख आणि आपल्या जून्या दिवसांची आठवण करून देत विवेकने एक फोटो शेअर केले आहे. या फोटोत खास म्हणजे शाहरुखसोबत उभी असलेली एक महिला. शाहरुखबरोबर उभ्या असलेल्या या मुलीला आपण ओळखतलं का?

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या फोटोत शाहरुखसोबत उभी असलेली महिला त्याची बहीण शहनाज लालारुख खान आहे. वास्तविक शाहरुखची बहीण लाईम लाईटपासून दूर राहत आहे,  यामुळे तीला ओळखणं कठीण आहे. हा फोटोही खूप जूना आहे. चित्रात गौरीच्या हातातल्या बांगड्या पाहून असे दिसते आहे की शाहरुखच्या लग्नानंतरचा लगेचच काढलेला हा फोटो आहे. फोटोत शाहरुख आणि त्याच्या बहीणतसुद्धा खूप साम्य आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

चित्रात शाहरुख आणि त्याची बहीण व्यतिरिक्त  पत्नी गौरी खान आणि स्वत: विवेक आणि त्यांची आई दिसत आहेत. विवेकने शाहरुख खानबरोबर प्रसिद्ध चित्रपट ‘राजू बन गया जेंटलमॅन’ बनविला. याशिवाय विवेक शाहरुखसोबत तो ‘इंग्लिश बाबू देसी मेम’, ‘दुल्हा मिल गया’, ‘कभी हम कभी ना’, ‘किंग अंकल’ आणि ‘जोश’ मध्येही एकत्र काम केलय.