vivek oberoy

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात भाजपाचे नेते आणि समर्थकांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विवेक ओबेरॉयच्या चौकशीचे संकेत दिले आहेत. सचिन सावंत यांनी भाजपाचे बॉलिवूड ड्र्ग्ज कनेक्शनशी संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज कनेक्शन उघड झाले होते. मात्र याचा योग्य तपास झाला नसल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood drugs case) प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयही (Vivek Oberoi) अडचणीत येण्याची शक्यता आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात विवेक ओबेरॉयची (troubles escalate in drug case) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री निल देशमुख (Anil deshmukh) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मार्कोटिक्स कंटोल ब्युरो (NCB) म्हणजेच एनसीबीकडून ही चौकशी करण्यात यावी, असे गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे. जर एनसीबीने ही चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी सुरु करणार असल्याची माहितीही अनिल देशमुख यांनी दिली आहे.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात भाजपाचे नेते आणि समर्थकांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विवेक ओबेरॉयच्या चौकशीचे संकेत दिले आहेत. सचिन सावंत यांनी भाजपाचे बॉलिवूड ड्र्ग्ज कनेक्शनशी संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज कनेक्शन उघड झाले होते. मात्र याचा योग्य तपास झाला नसल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. एनसीबीने केलेल्या तपासात जनतेची दिशाभूल झाल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चरित्रपट करणाऱ्या एका निर्मात्याचे नावही ड्रग्ज प्रकरणात असल्याची चर्चा आहे, मात्र त्या निर्मात्याची अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही.

विवेक ओबरॉय अडचणीत

केंद्रीय गुन्हे शाखेने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात अनेक मोठ्या लोकांची नावे समोर येत आहेत. आतापर्यंत संजना गलरानी, रागिनी द्विवेदी, रवीशंकर अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. एवडेच नाही तर हे प्रकरण आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरापर्यंत पोहोचले आहे. अलिकडेच विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याला पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिलादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुरू पोलिसांनी छापेमारी केली होती. ही छापेमारी आदित्य अल्वाशी संबंधित प्रकरणात करण्यात आली होती.