vivek oberoy and his wife

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सँडलवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात रागिनी द्विवेदीचे नाव समोर आले आहे. त्यानंतर आता आदित्य अल्वाचेही नाव घेण्यात आले आहे. आदित्य हा विवेक ऑबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. तसेच आदित्यचे नाव या प्रकरणात आल्यापासून तो फरार आहे. पोलिसांना खबर मिळाली होती की, आदित्य मुंबईत विवेकच्या घरी आहे. म्हणून कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील विवेक ऑबेरॉयच्या घरी छापा टाकला होता.

मुंबई : सँडलवुड ड्रग्ज (Sandalwood Drugs) प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या (Vivek Oberoi) घरी बंगळूरू पोलिसांनी काल छापा टाकला होता. आता बंगळूरुच्या सिटी क्राईम ब्रांचने विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला नोटीस पाठवली (Crime Branch sends notice to wife) आहे. ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याचा पोलीस तपास करत आहेत. तो फरार झाला आहे. त्यामुळे प्रियंका अल्वा आणि आदित्य अल्वा हे भाऊ-बहिण असल्यामुळे तिचाही ड्रग्ज प्रकरणात हस्तक्षेप असेल असे क्राईम ब्रांचचा अंदाज आहे.