‘या’ नवोदित कलाकाराने जपलं सामाजिक भान, २५व्या वाढदिवसानिमित्त केले धान्य वाटप!

वृषभची ही धाडसी आणि मदतीसाठी पुढे सारसावणारी वृत्ती नक्कीच त्याच्या अभिनयातुन दिसेल यातही शंकाच नाही अशा प्रकारची मदत करून वृषभने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच घर केले आहे.

    सध्या सर्वच कलाकारांचे कोरोना अभावी गरजूंसाठी मदतीचे हात पुढे सरसावताना दिसत आहेत. कलाकारांनी केलेली मदत ही काय नवीन बाब नाही पण मात्र तरुण, नवकलाकारांनी केलेली मदतीसाठी रेलचेल नक्कीच कौतुकास्पद ठरेल. अभिनेता वृषभ शाह हा नवोदित कलाकार असून आता लवकरच तो ‘शारदा प्रॉडक्शन’निर्मित ‘मंगलाष्टक रिटर्न’ आणि ‘वन फोर थ्री’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आज ६ जुलै वृषभच्या २५व्या वाढदिवसानिमित्त त्याने काही वस्तीतील किन्नर लोकांना धान्य वाटप केले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याने मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याची ही कर्तबगारी अर्थातच वाखाणण्याजोगी आहे. अभिनेता वृषभ शाह या नवोदित कलाकाराने केलेली ही कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. वृषभची ही धाडसी आणि मदतीसाठी पुढे सारसावणारी वृत्ती नक्कीच त्याच्या अभिनयातुन दिसेल यातही शंकाच नाही अशा प्रकारची मदत करून वृषभने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच घर केले आहे.

    अभिनेता वृषभ शाह याचा ‘वन फोर थ्री’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा नवोदित कलाकार नक्कीच त्याच्या अभिनयातुन प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल. लवकरच प्रेक्षकही त्याला आपलेसे करून घेतील यात काही शंकाच नाही. नेहमीच अभ्यासू, मेहनती असलेला हा अभिनेता लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि सामाजिक भान ठेवून आपल्यापुढे कामाचे आदर्श ठेवणाऱ्या अशा या अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वृषभच्या या २५व्या वाढदिवसानिमित्त त्याला वडील वीर कुमारजी शाह आणि आई वृषाली शाह यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिग्दर्शक योगेश भोसले यांनी देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    वाढदिवसाच्या निमित्ताने वृषभची ही आगळीवेगळी मदत करण्याची वृत्ती, समाजाबद्दलची असणारी आपुलकी नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील. त्याची ही उल्लेखनीय कामगिरी नक्कीच त्याच्या भावी आयुष्यात त्याच्या कामी येईल.