कोरोनामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीये, ज्येष्ठ अभिनेत्यांना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण,

'वागले की दुनिया'ची टीम सिल्वासाच्या बायो बबलमध्ये कमीतकमी कलाकार आणि क्रू मेंबर्ससह शूट करत आहे. जेडी मजीठियाच्या या सीरियलच्या सेटवर बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

    अभिनेते ​​अंजानन श्रीवास्तव पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परतण्यासाठी तयार आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांची काम करण्याची इच्छा पुर्ण होऊ शकत नाहीये. मालिकेचे निर्माते जेडी मजीठिया यांनी अंजान श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांना घरीच राहण्यास सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याने, निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

    अंजान मात्र या निर्णयामुळे नाराज आहेत, ते म्हणाले कोरोनाने मला घरीच कोंडून ठेवले आहे. मी काम करण्यास तयार आहे आणि मला अनेक प्रेक्षक, तसेच माझ्या चाहत्यांकडून संदेश येत आहेत की मी पुन्हा ‘वागले की दुनिया’मध्ये परतावे. त्यांना मला बघायचे आहे. तो मला खूप मिस करत आहेत. पण शोचे निर्माते मात्र खूप काळजीत आहेत.

    ‘वागले की दुनिया’ची टीम सिल्वासाच्या बायो बबलमध्ये कमीतकमी कलाकार आणि क्रू मेंबर्ससह शूट करत आहे. जेडी मजीठियाच्या या सीरियलच्या सेटवर बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. परंतु अंजान या प्रकरणात नशीबवान ठरले आहेत. कोरोना तपासणीसाठी झालेल्या चार टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले. परंतु त्यांच्या सह-अभिनेत्री भारती आचरेकर यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्या हळू हळू बऱ्या होत आहे.

    आज बाळासाहेब हवे होते…

    या काळात अंजान यांना बाळासाहेब ठाकरेंची खूप आठवण येत आहे. सध्याच्या काळात उद्योग विश्वाला त्यांची सर्वात जास्त गरज आहे, असे अंजान यांना वाटते. ते म्हणाले की, आम्ही आमची विचारसरणी खूप जुळायची. कारण मी आयपीटीएशी संबंधित आहे, ते कलाकारांचा खूप आदर करत असत आणि आताच्या परिस्थितीतही त्यांनी नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता.