‘फॅारेन रिटर्न’चा वेल सेटल मुहूर्त, एक सशक्त मेसेज देण्याचा प्रयत्न

अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये निर्माते-दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या प्रमुख उपस्थितीत 'फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल'चा मुहूर्त करण्यात आला. यावेळी 'फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल' हे टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं. गीतकार श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेलं हे टायटल ट्रॅक वैशाली माडेनं गायलं आहे.

    काही मराठी चित्रपटांची टायटल्स लक्ष वेधून घेणारी ठरतात. अशांपैकीच एक टायटल आहे ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’. या चित्रपटाचा श्रीगणेशा नुकताच गाण्याच्या रेकॅार्डिंगनं करण्यात आला. पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

    अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये निर्माते-दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’चा मुहूर्त करण्यात आला. यावेळी ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ हे टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं. गीतकार श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेलं हे टायटल ट्रॅक वैशाली माडेनं गायलं आहे.

    संगीतकार दिनेश अर्जुना यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही पराग भावसार यांनी केलं आहे. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक भावसार एक सशक्त मेसेजही देण्याचा प्रयत्न करणार आहेत. पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे.

    डिओपी महेश आणे यांच्या नजरेतून हा चित्रपट पहायला मिळणार आहे. राहुल भातणकर या चित्रपटाचा संकलक असून, कोरिओग्राफी प्राण हंबर्डे करत आहे. कलाकारांची निवड केल्यावर लगेचच शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.