उगाचच चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नकोस, सेलिब्रिटींना फटकारल्यानंतर भावाने नवाजुद्दीनला सुनावले!

ॉ माणुसकीखातर, तुमच्या व्हेकेशनचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. इथे सर्वत्र भीषण परिस्थिती आहे. कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांसमोर दिखावा करू नका" अशा शब्दात नवाजने सेलेब्रेटींना सुनावलेलं.

    देशात कोरोनाची भीषण परिस्थिती असताना सोशल मीडियावर मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने फटकारलं. इथे लोकांन दोन वेळेचं जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा अशा शब्दात त्याने सेलेब्रेटींना सुनावलं होतं. मात्र आता त्याचा भाऊ शमस सिद्दीनी याने नवाजलाच फटकारलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्दिकी भावंडांमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

    नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणालेला…

    “एकीकडे जगभरात कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली असताना हे सेलिब्रिटी व्हेकेशनचे फोटो पोस्ट करत आहेत. इथे लोकांना जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा. सुट्ट्यांवर जाणं तितकं चुकीचं नाही जितकं त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं आहे. या लोकांनी मालदिवला तमाशा बनवून ठेवलाय. त्यांची पर्यटन उद्योगाशी काय व्यवस्था आहे मला माहित नाही. पण किमान माणुसकीखातर, तुमच्या व्हेकेशनचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. इथे सर्वत्र भीषण परिस्थिती आहे. कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांसमोर दिखावा करू नका”.

    शमस सिद्दीनी म्हणतो..

    तू इतका का चिडला आहेस? प्रत्येकाला कुठेही जाण्याता अधिकार आहे. प्रत्येकजण कर भरतोय. पण तुझं काय? समजासाठी तू काय केलंस हे मला सांगू शकतोस का? उगाचच चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नकोस