milind soman

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूटप्रकरणी मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण चर्चेत आला. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला. या फोटोवरून उलटसुलट चर्चाही झाल्या. अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी गप्प असणाऱ्या मिलींदने अखेर प्रतिक्रीया दिलीये.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

याविषयी बोलताना एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद म्हणाला, “गेल्या कित्येक वर्षांपासून मी न्यूड फोटोशूट करतोय. जेव्हा मी पहिल्यांदा केलं, तेव्हासुद्धा चर्चेत होतो. गोव्याच्या प्रकरणापूर्वीही मी अनेक न्यूड फोटोशूट केले आहेत” असं तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

पुढे बोलताना मिलिंद म्हणाला,  “मी जेव्हा जेव्हा न्यूड फोटोशूट करतो,  तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. नग्न व्यक्ती म्हणजे काय? जसं देवाने आपल्याला बनवलंय तेच. असं नाहीये ना की आपण इंटरनेटवर नग्न लोकांना पाहू शकत नाही. इन्स्टाग्रामवर असे बरेच न्यूड फोटो असतात. प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची स्वप्नं वेगवेगळी असतात. यावेळी बोलताना मिलिंद सोमणने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाल्याचं नाकारलं. मला अद्याप याविषयीही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

मिलिंदने त्याच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. या फोटोवरून सोशल मीडियावरही बराच वाद झाला. लवकरच मिलिंद ‘पौरषपूर’ या आगामी वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.