‘प्रियांका ताई, तुमचं हे काय चाललं आहे?’ प्रियांका- निकच्या ‘त्या’ फोटोवर बहिण परिणीतानेच केलं ट्रोल, म्हणाली

एका फोटोमध्ये प्रियांका सनबाथ घेत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका बिचवर विसावली आहे आणि तिच्या मागे पती निक जोनस काटा चमचे घेऊन मजेशीर पोझ देत आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियांका सोशल मीडियावर सतत काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आपल्या हॉटेलमुळे चर्चेत आलेली प्रियांका आता पती काढलेल्या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. या आधीही तिने अनेक वेळा हॉट फोटो शेअर केले होते. पण यावेळी फोटोबघून चाहते भडकले आहेत. तर खुद्द प्रियांकाच्या बहिणीनेच म्हणजे परिणिता चोप्रानेच तिला ट्रोल केलं आहे.

    प्रियांकाने इन्स्टाग्रामवर सकाळी दोन फोटो शेअर केले. यामध्ये तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज दिसत आहे. प्रियांकाने या फोटोत बिकीनी परिधान केली आहे. एका फोटोत निकसुद्धा आहे. एका फोटोमध्ये प्रियांका सनबाथ घेत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका बिचवर विसावली आहे आणि तिच्या मागे पती निक जोनस काटा चमचे घेऊन मजेशीर पोझ देत आहे.

    या फोटोवर कमेंट करत परिणीतीने प्रियांकाला ट्रोल केलं आहे. परिणीती म्हणते, ‘प्रियांका ताई, तुमचं हे काय चाललं आहे? इन्स्टाग्रामवर कुटुंबातील माणसंदेखील आहेत, डोळे बंद करत फोटोला लाइक करण्याचा प्रयत्न करत आहे,’

    त्या फोटोमुळे प्रियांका ट्रोल होऊ लागली आहे. सगळ्यांच्या मते हा फोटो अत्यंत विचित्र आणि ऑड आहे. अनेकांनी प्रियांकाला कमेट्स करत संस्कृतीचा विसर पडल्याचं म्हटलं आहे.  ‘भारताची संस्कृती विसरलीस का? लाजसुद्धा विसरलीस’ तर आणखी एका युजर्सने कमेंट् करत म्हटलं आहे, ‘हे आम्ही काय पाहात आहोत?’ तर दुसऱ्या एकाने ‘ऑड’ असं म्हटलं आहे.