ओटीटी (OTT) प्लॅटफॉम म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

OTT हा एक प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर तुम्ही चित्रपट, वेबसिरीज, मालिका आणि माहितीपट बघू शकता. आजकाल जास्तीत जास्त चित्रपट हे...

  अलीकडच्या काळात ओटीटी हा शब्द मोठ्याप्रमाणात ऐकण्यात येतो. कोरोना सुरु झाल्यापासून वेबसिरीज आणि चित्रपटासंदर्भात OTT ची मोठ्याप्रमाणात चर्चा ऐकण्यात येत आहे. चर्चा जरी होत असली तरी अनेकांना OTT हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. जाणून घेऊया त्याबद्दल थोडीशी माहिती.

  OTT हा एक प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर तुम्ही चित्रपट, वेबसिरीज, मालिका आणि माहितीपट बघू शकता. आजकाल जास्तीत जास्त चित्रपट हे थिएटरच्या ऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होतात.

  OTT म्हणजे काय?

  OTT चा फुल फॉर्म Over-The-Top (ओवर-द-टॉप) असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर OTT हे Video Streaming Service आहे. विदेशात याला मोठी मागणी आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून भारतात OTT सर्व्हिसला मागणी वाढत आहे. Covid-19 मुळे संपूर्ण देश ठप्प झाले होते. थिएटर सर्व काही बंद होते. म्हणून सगळे चित्रपट हे OTT Apps व प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित केले गेले. त्यांना खूप पसंती मिळाली.

  Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, ZEE5, Sony Liv ही सगळी OTT प्लॅटफॉम आहे.

  OTT Apps वर तुम्हाला चित्रपट व वेब सीरिज पाहण्यासाठी ठराविक शुल्क भरावा लागतो. काही  OTT सर्व्हिस मोफतही उपलब्ध आहे.