या कारणामुळे बिग बींची मुलगी श्वेता आणि सून ऐश्वर्यामध्ये नेहमी होतं भांडण, मुलाखतीत केला खुलासा!

ऐश्वर्या आणि श्वेताचे खूप चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. तिला ऐश्वर्याची कुठली गोष्ट बिलकूल आवड नाही? ज्यामुळं ती तिच्यावर चिढली देखील असेल... असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला.

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मलगी श्वेता नंदा ही सिनेसृष्टीत कार्यरत नाही. श्वेता एक प्रसिद्ध ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर आहे. तरी देखील ती कायम चर्चेत असते.अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिनं ऐश्वर्या रायची पोलखोल केली  आहे.

    ऐश्वर्या आणि श्वेताचे खूप चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. तिला ऐश्वर्याची कुठली गोष्ट बिलकूल आवड नाही? ज्यामुळं ती तिच्यावर चिढली देखील असेल… असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला.

    यावर श्वेता म्हणाली, “ऐश्वर्या कधीच कोणाचे फोन वेळेवर उचलत नाही. किंवा मिसकॉल पाहून लगेच फोनही करत नाही. यामुळं बच्चन कुटुंब अनेकदा तिच्यावर चिडलं आहे. पण त्यानंतर लगेचच तिनं ऐश्वर्याची स्तुती केली. ती एक उत्तम आई आहे. तिनं आपल्या मलीवर खुप चांगले संस्कार केले आहेत. शिवाय ती आपल्या मुलीला कायम प्रोत्साहन देते.