ब्रेकअपनंतर आजही नाना पाटेकरांना येतेय मनिषा कोईरालालाची आठवण, म्हणाले ‘ती कस्तुरी आहे….’

अग्निसाक्षी’ या चित्रपटानंतर नाना आणि मनीषा दोघांनी खामोशी या चित्रपटात पुन्हा एकदा काम केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीषाच्या शेजार्‍यांनी सांगितले की सकाळी नाना पाटेकर यांना बऱ्याच वेळा तिच्या घरातून बाहेर पडताना पाहिले आहे.

  अभिनेते नाना पाटेकर ९० च्या दशकात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत होते. त्याचवेळी त्यांच वैयक्तिक आयुष्य मोठ्याप्रमाणावर चर्चेत आलं. नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा त्याकाळी रंगल्या होत्या.

  १९९६ साली आलेल्या अग्निसाक्षी या चित्रपटात नाना आणि मनिषाने काम केलं होतं. त्याचदरम्यान अभिनेता विवेक मुशरान आणि मनिषाचं ब्रेकअप झाला होतं. तर, नाना आणि  मनीषाला त्यांच्यात जवळीक वाढू लागली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी कळताच हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहा बाहेर लोकांनी गर्दी केली.

  ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटानंतर नाना आणि मनीषा दोघांनी खामोशी या चित्रपटात पुन्हा एकदा काम केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीषाच्या शेजार्‍यांनी सांगितले की सकाळी नाना पाटेकर यांना बऱ्याच वेळा तिच्या घरातून बाहेर पडताना पाहिले आहे. यावर नाना एका मुलाखतीत म्हणाले होते की, “मनीषा बहुतेक वेळा माझ्या आई आणि मुलाला भेटायला येत असते आणि माझ्या कुटुंब ही तिला प्रेमाने भेटायचे”.

  दोघांमधील भांडणं वाढली

  नाना आणि मनीषा दोघेही तापट स्वभावाचे होते. बऱ्याचवेळा त्या दोघांचे भांडण झाले. त्यावेळी नाना त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते. याचदरम्यान , अभिनेत्री आयशा जुल्का आणि नाना पाटेकर यांच्यात जवळीक वाढु लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नाना यांच्या या वागणुकीमुळे मनीषाने त्यांच्या सोबत न राहणे पसंत केले आणि तिने मूव्ह ऑन केले. ब्रेकअप होऊनही नाना मनीषाला विसरले नव्हते. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मनीषा ही उत्तम अभिनेत्री आहे. ती कस्तुरी हरणाप्रमाणे आहे, तिने समजून घेतले पाहिजे की तिला कोणाबरोबर राहणे आवश्यक नाही. तिच्याकडे सगळं आहे आणि गरजेपेक्षा जास्त आहे.”

  ते पुढे म्हणाले, “आज ती स्वत: सोबत काय करत आहे हे पाहून माझे अश्रु अनावर होतात. मला आज तिच्याबद्दल काही बोलायचे नसले तरी ब्रेकअप हा सगळ्यात कठीण काळ आहे. मी ज्या दु:खातून गेलो ते मी सांगू शकत नाही. मला मनीषाची आठवण येते.”