त्याने सुष्मिता सेनसाठी बायको आणि मुलीलाही सोडलं, आत्महत्येचा प्रयत्नही केला, आता होतोय त्याला पश्चाताप!

मात्र त्यांच्या या निर्णयाचा त्यांना नंतर धक्का बसला. विक्रम यांनी नंतर याबद्दल खंत व्यक्त केली होती. 'एका इमॅच्यूर रिलेशनशिपसाठी मी पत्नी आणि मुलीला सोडून दिलं, याचा मला पश्चात्ताप होतो

    बॉलिवूडमध्ये चित्रपटांइतकेच प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध, यांची चर्चा होते. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे सिनेमे तर पाहायला आवडतात आणि त्यांच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्यातही रस असतो. दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेन यांच्या प्रेमप्रकरणाचा किस्सा चांगलाच गाजला होता. त्या वेळी त्यांच्या या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा होती.  

    १९९६ मध्ये सुष्मिता २०-२१  वर्षांची, तर विक्रम भट्ट साधारण २७ वर्षांचे होते. त्या वेळी महेश भट्ट दिग्दर्शित करत असलेल्या ‘दस्तक’ या सिनेमाच्या सेटवर त्यांच प्रेमप्रकरण सुरू होतं. तेव्हा विक्रम यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगीही होती. त्यांच्या या प्रेमप्रकरणाची झळ साहजिकच त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यावेळी सुष्मितासाठी विक्रम यांनी चक्क आपली पत्नी अदिती आणि मुलगी या दोघींना सोडून द्यायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

    मात्र त्यांच्या या निर्णयाचा त्यांना नंतर धक्का बसला. विक्रम यांनी नंतर याबद्दल खंत व्यक्त केली होती. ‘एका इमॅच्यूर रिलेशनशिपसाठी मी पत्नी आणि मुलीला सोडून दिलं, याचा मला पश्चात्ताप होतो,’ असं ते म्हणाले होते. सुष्मिता आणि आपल्यात जे काही झालं होतं, त्याला वय कारणीभूत होतं, असंही ते म्हणाले होते.

    माध्यमांशी बोलताना विक्रम म्हणाले होते, ‘माझी पत्नी आणि मुलगी यांना मी सोडून दिलं, त्यांना दुःख दिलं याचं मला खूप दुःख झालं. मला त्याचा पश्चात्ताप होतो. मला असं वाटतं, की जेव्हा आपल्यात हिंमत नसते, तेव्हा आपण चलाखी करत जातो. मला नेमकं काय वाटत होतं, ते अदितीला सांगण्याची हिंमत मला होत नव्हती. हे सगळं एकदमच घडून आलं. तेव्हा मी कमजोर पडलो नसतो, तर आज कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं.’

    आत्महत्येचा प्रयत्न

    विक्रम यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता; मात्र त्यासाठी त्यांनी सुष्मिताला जबाबदार धरलं नव्हतं. आपण आयुष्यात ज्या काही चुका केल्या, त्या त्यासाठी कारणीभूत होत्या, असं त्यांनी सांगितलं होतं. ‘मीच माझ्या आयुष्याचं मातेरं करून टाकलं होतं, हे त्यामागचं कारण होतं,’ असं ते म्हणाले होते. कोणत्या एका नात्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं मला वाटत नाही. या साऱ्याला मी स्वतःच जबाबदार होतो,’ असं विक्रम यांनी सांगितलं होतं.