jaan kumar sanu

बिग बॉस हा शो कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी हा शो चक्क मराठी भाषेमुळे चर्चेत(dispute on marathi language in big boss) आला आहे. गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू (jan kumar sanu)याला मराठी भाषा आवडत नाही.  मराठी ऐकल्यावर माझ्या डोक्यात तिडीक जाते असं तो म्हणाला. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर(mahesh tilekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

बिग बॉस हा शो कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी हा शो मराठी भाषेमुळे चर्चेत(dispute on marathi language in big boss) आला आहे. गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू (jan kumar sanu)याला मराठी भाषा आवडत नाही.  मराठी ऐकल्यावर माझ्या डोक्यात तिडीक जाते, असं तो म्हणाला. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर(mahesh tilekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

महेश टिळेकर यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर टीका केली आहे. महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का राहावे?, अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूबाबत संताप व्यक्त केला.

बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये जान कुमार सानू  आहे. अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत बोलत होती. त्यावेळी जान कुमारने तिला सांगितलं की, मला मराठी भाषा आवडत नाही. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस. मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते.