हृतिक रोशनची एक्स बायको सुझान खान म्हणून गेली होती वांद्रे पोलीस स्थानकात, खरं कारण आलं समोर!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आणि हृतिक रोशनची एक्स बायको कालपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण काही दिवसांपूर्वी सुझान वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, सुझान एका महत्त्वाच्या कामासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं सांगण्यात येत आहे. सुझान लवकरच वांद्रे पोलीस स्टेशनचा कायापालट करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वर्ल्ड ऑफ वर्दी या उपक्रमाअंतर्गत वांद्रे पोलीस ठाण्याला नवा लूक देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सुझान खानने सहभाग घेतला असून ती वांद्रे पोलीस स्टेशनचं नवीन इंटेरिअर करणार आहे. सुझान पोलीस स्टेशनचं इंटेरिअर अगदी विनामूल्य करणार आहे. काही दिवसापूर्वी सुझान आयएएस अधिकारी अभिषेक सिंगसोबत वांद्रे पोलीस ठाण्यात गेली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, पोलीस स्टेशनच्या कायापालटचं काम सुरु करण्यापूर्वी त्याची पाहणी करण्यासाठी सुझान वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. त्यामुळे लवकरच सुझान तिच्या पुढील कामासाठी वळणार आहे. सुझान खान हे कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. “वर्ल्ड ऑफ वर्दी हा माझा नवा उपक्रम नागरिकांना आपल्या देशाच्या सशस्त्र सैन्याच्या अधिक जवळ आणण्याविषयी आहे. त्यामुळेच पोलीस स्टेशनचा कायापालट करणं ही यातली पहिली पायरी आहे. या उपक्रमामध्ये सुझान खान सहभागी होत असून तिने वांद्रे पोलीस स्टेशनपासून याची सुरुवात केली आहे.यावेळचे फोटो ‘विरल भैय्यानी’ यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.