aamir khan and kiran rao

घटस्फोटानंतर आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्याही अफवा उठल्या. आता आमिरचा भाऊ फैजल खानने यावर वक्तव्य केलं आहे.

    अभिनेता अमिर खान आणि त्याची बायको किरण राव काही दिवसांपूर्वी घटस्फोटांमुळे चर्चेत आले. लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेगळं होत असल्याची माहिती सगळ्यांना दिली. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. त्यांच्या घटस्फोटानंतर आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्याही अफवा उठल्या. आता आमिरचा भाऊ फैजल खानने यावर वक्तव्य केलं आहे.

    फैजलने नुकतेच या दोघांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, ‘माझं स्वत:चं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही, तर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारा मी कोण आहे, त्यांना त्यांच चांगलं काय हे माहित आहे. अशा अफवा आहेत की आमिर दुसऱ्या कोणावर प्रेम करतो आणि लवकरच तो लग्न करणार आहे. या प्रश्नावर फैजल म्हणाला, ‘मी त्यांना सल्ला देऊ शकत नाही. माझं वैवाहिक जीवन टिकू शकलं नाही.’

    १५ वर्षांचा सहवास संपला

    “१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते, विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू”