सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय ?

सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. परंतु याच प्रकरणाची कारवाई पाटणाऐवजी मुंबईतून केली जावी, अशी याचिका तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय ११ वाजताच्या सुमारास निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार ?, तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय ? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. परंतु याच प्रकरणाची कारवाई पाटणाऐवजी मुंबईतून केली जावी, अशी याचिका तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय ११ वाजताच्या सुमारास निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार ?, तसेच या सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय ? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाचं लक्ष आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी युवकांचं असं म्हणणं आहे की, सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयकडून आम्हांला मोठ्या अपेक्षा आहेत. कारण सुशांतने आत्महत्या केली नाही. तर, त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज मह्त्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

रियानं सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. याप्रकरणीचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्याचा राज्याला अधिकार नसल्याची बाब उचलून धरली होती. मात्र मंगळवारी रियाकडून आलेल्या वक्तव्यामध्ये तिनं या प्रकरणात खोटी माहिती पुरवण्यात येत असून त्याला राजकीय वळण दिलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.