‘वंडर वूमन १९८४’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे

हॉलिवूड अॅक्ट्रेस गॅल गॅडोटचा चित्रपट ‘वंडर वूमन १९८४’ ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. गॅल गॅडोटसह या चित्रपटात क्रिस पाईनदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आता २ ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनामुळे चित्रपट सृष्टीवर परिणाम झाला आहे. अनेकांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. अशातच अभिनेत्री गॅल गॅडोटने आपल्या ‘वंडर वूमन १९८४’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

गॅलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘वंडर वूमन १९८४’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख २ ऑक्टोबर आहे. मी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. तुमच्यामुळे हे शक्य होत आहे. सगळ्या प्रशंसकांचे आभार.

‘वंडर वूमन १९८४’ हा २०१७मध्ये आलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅटी जेनकिन्स यांनी केले आहे.