लहान स्तनांमुळं चित्रपटातून निर्मात्यांनी केलं होतं बाहेर, आता आहे वंडर वुमन, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक किस्सा!

बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन या चित्रपटात तिनं सर्वप्रथम ही भूमिका साकारली होती. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ती या चित्रपटात निर्मात्यांनी नाकारलं होतं. तिचे स्तन लहान असल्यामुळं निर्मात्यांनी तिला करारबद्ध केल्यानंतरही बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता.

  गल गेदॉत ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मादक अदा आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर तिनं अल्पाधित तुफान लोकप्रियता मिळवली. तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

  तिनं आजवर ट्रिपल नाईन, क्रिमिनल, फास्ट अँड फ्युरिअस, नाईट अँड डे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ती वंडर वुमन या व्यक्तिरेखेमुळं. वंडर वुमन ही एक लोकप्रिय सुपरहिरो व्यक्तिरेखा आहे. बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन या चित्रपटात तिनं सर्वप्रथम ही भूमिका साकारली होती. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ती या चित्रपटात निर्मात्यांनी नाकारलं होतं. तिचे स्तन लहान असल्यामुळं निर्मात्यांनी तिला करारबद्ध केल्यानंतरही बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

  परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक जॅक स्नायडर आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर दिग्दर्शकाचा निर्णय योग्य ठरला गलने अक्षरश: जिव ओतून ही भूमिका साकारली. या व्यक्तिरेखेनं गलला इतकी लोकप्रियता मिळवून दिली की आज तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी वंडर वुमन या नावानंच ओळखलं जातं.