लेखक पुंडलिक पालवे यांचं कोरोनाने निधन, अनेक मराठी चित्रपटांच्या लेखनात होता सहभाग!

गेली ३० वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने ते संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे सहाय्यक लेखक म्हणून हौशेने काम पहात होते.

    ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या गाजलेल्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र  पालवे यांचे काल दिनांक २५ एप्रिल रोजी, रात्री ११.३० वाजता नाशिक येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते गेले १३ दिवस नाशिकमध्ये एका रुग्णालयात करोनावर उपचार घेत होते.

    प्रख्यात लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्यासोबत त्यांचा जवळचा स्नेह होता. त्यांच्या ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लहान लहान भूमिका केल्या होत्या. ‘बंदिशाळा’ या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते. तसेच गेली ३० वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने ते संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे सहाय्यक लेखक म्हणून हौशेने काम पहात होते.