sunny deol

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा (y plus security to sunny deol)पुरवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सनी देओल यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाची एक टीम नेहमी उपस्थित राहणार आहे.

दिल्ली: बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा (y plus security to sunny deol)पुरवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सनी देओल यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाची एक टीम नेहमी उपस्थित राहणार आहे. जिवाला धोका असल्यामुळे सनी देओल यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत सनी देओल यांच्यासोबत ११ जवान आणि २ पीएसओ तैनात असणार आहेत. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. गुरुदासपूर भारत आणि पाकिस्तानाच्या सीमेजवळचा भाग आहे. देशात मुख्यत: राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असल्याने सनी देओल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या दरम्यान शेतकरी संघटनांकडून भाजप मंत्र्यांना आणि नेत्यांना घेराव घालण्याची योजना तयार करण्यात आली होती. खासदार सनी देओल पंजाबशी निगडीत आहेत. अशावेळी कृषी कायद्यांवर त्यांनी मात्र गप्प राहणेच पसंत केले आहे.