बंगाली भाषेच्या प्रेमात यामी गौतमी!

या इन्व्हेस्टिगेटीव्ह ड्रामाचं शूटिंग कोलकात्यामध्ये सुरू आहे. या कॅरेक्टरला स्थानिक भाषेचा रंग चढवता यावा यासाठी यामी बंगाली शिकत असल्याचं समजतं.

    मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळल्यानंतर अल्पावधीत एका मागोमाग एक यशाची पायरी चढताना विविधांगी कॅरेक्टर्स साकारणारी यामी गौतम लवकरच क्राईम रिपोर्टरच्या रूपात दिसणार असल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘लॉस्ट’ या चित्रपटात यामीचं रिपोर्टींग पहायला मिळणार असून, सध्या ती याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

    या इन्व्हेस्टिगेटीव्ह ड्रामाचं शूटिंग कोलकात्यामध्ये सुरू आहे. या कॅरेक्टरला स्थानिक भाषेचा रंग चढवता यावा यासाठी यामी बंगाली शिकत असल्याचं समजतं. आपल्या रोलसाठी महत्त्वाचं असणारं सारं काही करण्यासाठी यामी मेहनत घेत आहे. याबाबत यामी म्हणते की, बंगाली भाषेतील उच्चार स्पष्ट आणि नीट व्हावेत यासाठी मेहनत घेत आहे. यासाठी मी सेटवरही बंगाली क्रूसोबत संभाषण करत त्यांची भाषा आणि शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. यामीनं नेहमीच आपल्या कॅरेक्टरसाठी आवश्यक असलेल्या बोलीभाषा शिकल्या आहेत. ‘दसवीं’साठी तिनं हरियाणवी भाषेचे धडे गिरवले आहेत.