पत्नीच्या तक्रारीनंतर ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक!

अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपोसून सोबत आहेत. २०१२त्या दोघांनी लग्न केलं. दोघांनाही ४ वर्षांचा मुलगा आहे. करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं म्हटलं जात होत.

  ‘ये रिश्ता क्या कहलता है’ मालिकेतील मुख्य अभिनेता करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. याचदरम्यान मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अभिनेता करण मेहराला अटक केली. करणची पत्नी अभिनेत्री निशा रावलने करणच्या विरोधात  गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. एएनआय वृत्तसंस्थेने या बद्दलची माहिती दिली आहे.

  अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपोसून सोबत आहेत. २०१२त्या दोघांनी लग्न केलं. दोघांनाही ४ वर्षांचा मुलगा आहे. करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं म्हटलं जात होत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा यांच्या वैहाहिक आयुष्यात दरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र निशाने या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हंटलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

  करण म्हणालेला…

  “मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. मात्र आता मी मुंबईला परतलो असून सध्या क्वारंटाईन आहे. माझ्या सेटवर काही जणांना करोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. मी घरातच आहे. दोन तीन चाचण्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी माझी तब्येत थोडी बिघडली आहे. म्हणून मी घरातच क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे.” असं म्हणत करणने सर्वकाही सुरळीत असल्याचं करणने स्पष्ट केलं होतं.