CID च्या या कलाकाराने लग्नाच्या १७ वर्षांनंतर घेतला घटस्फोट, अखेर दिली प्रतिक्रीया!

२०१४ मध्ये दोघांनी वेगवेगळं राहायला सुरुवात केली आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. काही कारणांनी ही प्रक्रिया रखडली आणि तब्बल सात वर्षांनी यंदा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाल्याचं हृषीकेश यांने सांगितलं.

  सेलेब्रिटीजचं लग्न जसं चर्चेचा विषय असतं, तसंच त्यांचे घटस्फोटही चर्चेचा विषय असतो. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ह्रषीकेश पांडे याने गेली अनेक वर्षे आपल्या विभक्त आयुष्याबद्दल कधीही वाच्यता केली नाही. अखेर त्याने आपल्या घटस्फोटावर तोंड उघडलं आहे. २०१४ पासूनच विभक्त राहणाऱ्या हृषीकेश आणि त्रिशा दुभाष  यांना सात वर्षांनंतर घटस्फोट मिळाला आहे. १७ वर्षांचं त्यांचं वैवाहिक आयुष्य कायदेशीररित्या आता संपुष्टात आलं आहे. त्यांचा मुलगा दक्ष याची कस्टडी हृषीकेशला मिळाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrishikesh Pandey (@hrishikesh.11)

  त्यानंतर प्रथमच हृषीकेशनं याबाबतीत माध्यमांना खुलेपणानं सांगितलं आहे. हृषीकेश पांडे यानं एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबाबत माहिती दिली. सोनी टीव्हीवरील गाजलेली मालिका सीआयडीमध्ये (CID) महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हृषीकेश पांडे याने ये रिश्ता क्या कहलाता है, जग जननी मां वैष्णोदेवी अशा अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. २००४ मध्ये त्यानं त्रिशा दुभाष हिच्याशी विवाह केला होता, पण काही वर्षातच त्यांचं पटेनासे झालं. २०१४ मध्ये दोघांनी वेगवेगळं राहायला सुरुवात केली आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. काही कारणांनी ही प्रक्रिया रखडली आणि तब्बल सात वर्षांनी यंदा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाल्याचं हृषीकेश यांने सांगितलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrishikesh Pandey (@hrishikesh.11)

  हृषीकेशनं आपल्या मुलाला कधीही त्याच्या आईला भेटण्याची मोकळीक दिली आहे. त्याचे तिकडच्या आजी-आजोबांशी चांगले संबंध आहेत. आपल्या सासू सासऱ्यांनीदेखील आम्ही विभक्त होणार म्हटल्यावर काहीही आढेवेढे न घेता आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यानं म्हटलं आहे.