चाहत्यांसाठी येशाच्या खास मेकअप टिप्‍स, अशी घेतेय ती त्वचेची काळजी!

येशा म्‍हणाली की, फॅशन व मेकअप एकमेकांशी निगडित आहेत. फॅशनबाबत जाणून घेण्‍यास उत्‍सुक असलेली कोणतीही व्‍यक्‍ती आपोआप मेकअप ट्रेण्‍ड्सचा संदर्भ पाहते आणि हेच उलट देखील आहे.

    येशा रूघानी अभिनेत्री म्‍हणून सर्वांनाच माहित आहे. येशानं तिच्‍या अभिनय व फॅशन कौशल्‍यांसह प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनी सबवरील मालिका ‘हिरो – गायब मोड ऑन’मध्‍ये स्‍टारलेट झाराची भूमिका साकारणाऱ्या येशाला फॅशनची उत्तम जाण आहे. तिनं तिच्‍या चाहत्‍यांसाठी, तसंच ग्रूमिंग करण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या, पण सुरूवात कशी करावी हे माहित नसलेल्‍यांसाठी काही सोप्‍या व आकर्षक फॅशन टिप्‍स सांगितल्‍या आहेत.

    येशा म्‍हणाली की, फॅशन व मेकअप एकमेकांशी निगडित आहेत. फॅशनबाबत जाणून घेण्‍यास उत्‍सुक असलेली कोणतीही व्‍यक्‍ती आपोआप मेकअप ट्रेण्‍ड्सचा संदर्भ पाहते आणि हेच उलट देखील आहे. कम्फर्ट म्हणजेच फॅशन आणि म्‍हणूनच मी आरामदायीपणा देणाऱ्या फॅशन ट्रेण्‍ड्सचा अवलंब करते. मला विंटेज स्‍टाइलची आवड आहे, कारण ती अगदी खास आकर्षक दिसते. मी स्‍टायलिंग शिकले आहे, ज्‍यामुळे मी स्‍कर्ट किंवा स्‍कार्फ खरेदी करताना नेहमीच काळजी घेते. मी विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं स्‍टाइल करते.

    मी नेहमीच आकर्षक शर्ट व पजाम्याला प्राधान्‍य देते. मी जे काही परिधान करते, त्‍याचा माझ्या मूडवर परिणाम दिसून येतो. झाराच्‍या भूमिकेमुळं माझ्या जीवनात बरेच बदल झाले आहेत. मला तिची स्‍टायलिंग आणि ग्‍लॅमरस मेकअप खूप आवडतो. मी फॅशन व मेकअपच्‍या संदर्भात माझ्या भूमिकेमधून खूप शिकत आहे.