‘त्याने माझा हात पकडला आणि….’ ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेआधी मोमो ला आला कास्टिंग काऊचचा अनुभव!

चित्रपटसृष्टीत आलेल्या मीराला दोन वेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे.

   ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मोमोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मोमो या भूमिकेमुळे मीरा घराघरात पोहोचली. मात्र आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मीरा चित्रपटसृष्टीत येण्याआधी योग प्रशिक्षक म्हणून काम करायची. चित्रपटसृष्टीत आलेल्या मीराला दोन वेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by 〽️ira Jagannath (@mirajagga)

  मीरा म्हणाली, “मला दोनवेळा कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. तू नवी आहेस, तुला कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं मला सांगण्यात आलं. मी नकार दिला. मेहनत करून संधी मिळवायची असं मला वाटतं. काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट मला मान्य नाहीत. थोड्या दिवसाचं फेम, एखादी सीरीज किंवा चित्रपट मिळवून फार काही साध्य होत नाही. एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आला,” असं मीरा म्हणाली.

  पुढे मीरा म्हणाली, “एकदा मला भूमिका देईल असं खोट सांगत त्याने हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याच्या सरळ कानशिलात लगावली आणि निघून आले. त्यानंतर दोन वर्षं मी काही काम केलं नाही. तुम्ही ठरवलं तर या सगळ्यापासून दूर राहू शकता. आता ओळखीतून आलेल्या कामालाच मी प्राधान्य देते.”