‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील स्वीटूचा डान्स बघितला का? व्हिडिओ होतोय व्हायरल!

या आधी अन्विताने मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती.

    सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.  ​तिनं वर्ल्ड डान्स डेच्या निमित्तानं एक डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यात ती अगदी उत्तम रित्या डान्स करताना दिसते आहे.

    सध्या अन्विता दमणमध्ये मालिकेचं शुट करतेय. दमन येथे येऊ कशी तशी मी नांदायलाची संपुर्ण टीम पोहोचलीये. अन्विताचा मालिकेतील स्वीटूचा निरागस अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेणारा आहे.

    या आधी अन्विताने मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर २०१९मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.