मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली, काय असणार मालविकाची प्रतिक्रिया!

मोहित आणि आई कडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत.

   एका गोड नात्याची कथा सांगणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. रसिकप्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अन्विता फलटणकर’आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  मोहित आणि आई कडून पदोपदी अपमान होऊन सुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत.

  अखेर तो दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी मोहीतला आणि त्याच्या आईला जाणवत की स्वीटू चं लक्ष ह्या सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे, ओम आणि स्वीटू मध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाहीये म्हणून त्या स्वीटू वर नको नको ते आरोप करतात. ह्या सगळ्यात ओम मध्ये पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो, आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो. ह्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा प्रचंड संताप होतो.

  या सर्व घडामोडीनंतर आता काय असेल मालविका ची पुढची खेळी? स्वीटूचा सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानंतर साळवी कुटुंब विशेषतः नलू मावशी ह्या प्रेमाला होकार देतील? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.