ओमच्या शर्टलेस फोटोच्या तरूणी पडल्या प्रेमात, पोस्ट बघून स्विटूने दिली ‘ही’ कमेंट!

मालिकेत ओम साकारणारा हॅण्डसम हंक, चॉकलेट बॉय, तरुणींचा लाडका अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

    झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. या मालिकेतील कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर हा सध्या चर्चेत आहे. शाल्वने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे ‘शर्टलेस’ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरू आहे.

    शाल्वने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर शर्टलेस फोटो शेअर करत वातवरणातील तापमानाचा पारा वाढवलाय. आत्तापर्यंत ३९ हजारांहून अधिक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर, अनेक चाहते विशेषतः तरुणी आणि मित्रमंडळींनी शाल्वच्या या फोटोशूटवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

    मालिकेत ओम साकारणारा हॅण्डसम हंक, चॉकलेट बॉय, तरुणींचा लाडका अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

    ‘स्वीटू’ साकारणाऱ्या अन्विता फलटणकर आणि ‘ओम’ साकारणाऱ्या शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. या दोघांमध्ये आता मैत्रीचं नातं बहरत असतानाच, प्रेमाचं नवं नातं देखील उमलू लागलं आहे.