‘ही बाई खरंच चक्रम आहे’, योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल Video होतोय व्हायरल!

वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

    राखी सावंत सध्या व्यायाम आणि योगा करतानाचे काही व्हिडीओ सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करत आहे. पण या व्हिडीओमध्ये तिनं केलेल्या कृती पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ही बाई खरंच चक्रम आहे असं म्हणत सध्या तिची खिल्ली उडवली जात आहे. लॉकडाउनमुळं सध्या जीम बंद आहेत. त्यामुळं राखी सावंत घरातच व्यायाम आणि योगा करत आहे. राखी काही प्रोफेशनल ट्रेनर्सच्या मदतीनं व्यायाम करत आहे. वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

    राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. १९९७ साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

    काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला ५० रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)