yogi aadityanath

बॉलिवुड सेलिब्रिटी भेटणार मुख्यमंत्र्यांना, फिल्म सिटीच्या उभारणीसाठी गुंतवणुकीचा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता, नोएडामध्ये नव्या तंत्रज्ञानासह फिल्म सिटी उभी राहणार

राज्य सरकार नोएडामध्ये अत्याधुनिक फिल्म सिटी उभारण्याची तयारी करत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबई भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वैयक्तिक स्वरुपावर या प्रकल्पात विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच आकाराला येण्याची शक्यता आहे.

या प्रक्रियेत, ते बॉलिवुडमधील ४१ सेलिब्रिटीजना भेटणार आहेत. यमुना अथॉरिटी ऑफ नोएडाच्या सेक्टर २१मध्ये १००० एकरांवर उभारल्या जाणाऱ्या इन्फोटेनमेंट सिटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी याआधीही काही महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. लखनऊमध्ये २२ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत त्यांनी सिनेक्षेत्रातील प्रतिनिधींकडून फिल्म सिटीसाठीच्या सूचना समजून घेतल्या. या बैठकीत सिनेसृष्टीत दिग्गज्जांनी यमुना अथॉरिटीला त्यांच्या सूचना दिल्या.

त्याशिवाय, या दिग्गजांनी मुख्यमंत्री योगी यांना फिल्म मेकिंगमधील प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या सर्व सुविधा एकाच छताखाली, एकाच जागी उपलब्ध करून देण्याची आणि क्लब, क्रीडा, गाव, टेलिपोर्ट, व्यावसायिक, अंतर्गत आणि बाह्य लोकेशन अशा सुविधा निर्माण करण्याची विनंती केली.

साऊंड मिक्सिंग स्टुडिओ, स्पेशल इफेक्ट्स, कलर ट्रान्सफर्मेशन, व्हिडीओ एडिटिंग अशा सुविधांची त्यांनी विनंती केली. फिल्म स्टुडिओ अशा प्रकारे उभारला जावा की बाहेरून ती अत्यंत महागडी, उंची इमारत वाटावी, त्यामुळे तिथे शुटिंग करता येईल आणि ही इमारत गरजेनुसार स्वरूप बदलता यावी अशी असावी, अशा सूचना त्यांनी केल्या. बॉलिवुडमधील सेलिब्रिटीजनी दिलेल्या सूचनांनुसार काम सुरू झाले आहे.

सरकारने डीटेल प्रोजेक्ट रीपोर्ट (डीपीआर) ऑफ इन्फोटेनमेंट सिटी म्हणजेच या प्रकल्पाचा आराखडा बनवण्यासाठी ‘एर्नेस्ट अॅण्ड यंग’ची सल्लागार एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. फिल्ममेकर्सच्या सूचना आणि राज्य सरकारची सिनेमाविषयक धोरणे लक्षात घेऊन ही एजन्सी डीपीआर तयार करत आहे. डीपीआर लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

गुंतवणुकीचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत चर्चिले जातील

मुख्यमंत्री योगी यांच्यासोबतच्या मुंबईतील बॉलिवुडमधील सेलिब्रिटीज यूपीमध्ये उभ्या राहणाऱ्या फिल्म सिटीबद्दल बोलतील. यावेळी अनेक गुंतवणूक प्रकल्पही फिल्मसिटीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि यावेळी बॉलिवुडमधील ज्येष्ठांसोबत मुख्यमंत्री गुंतवणूक प्रस्तावांची चर्चा करण्याचीही शक्यता आहे.

आज संध्याकाळी मुख्यमंत्री योगी मुंबईत पोहोचले आज ते अभिनेता अक्षय कुमार यांना आज रात्री भेटतील. त्यानंतर मुख्यमंत्री उद्या सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुमारे चार तास बॉलिवुडमधील सेलिब्रिटीजना भेटतील. या दरम्यान मुख्यमंत्री उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव, गोरखपूरचे खासदार आणि प्रसिद्ध कलाकार रवी किशन, दिनेश यादव ‘निरुआ’, बॉलिवुड स्टार रणदीप हुडा, अर्जुन रामपाल आणि सतिश कौशिक यांनाही भेटतील.

तसेच, निर्माते बोनी कपूर, अॅड लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मनमोहन शेट्टी, निर्माते आनंद पंडित, दिग्दर्शक सुभाष घई, मधुर भांडारकर, निर्माता राहुल मित्रा, निर्माता अजय राय, टी सीरिजचे अध्यक्ष भूषण कुमार, लायका प्रोडक्शन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग, जी. स्टुडिओज अॅक्विझिशन हेड जतिन सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी शारिक पटेल, वायकॉम १८ मोशन पिक्चर्सचे रूद्ररूप दत्ता, निर्माता राजीव मल्होत्रा, लेखक दिग्दर्शक नीरज पाठक, दिग्दर्शक उमेश शुक्ला, दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी, दिग्दर्शक अनिल शर्मा, निर्माता निखिल अडवाणी, लेखिका जुही चर्तुर्वेदी, निर्माता पूनम शिवदासानी, निर्माता मधु भोजवानी, कार्निवल ग्रूपचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी आणि वैशाली सरवणकर, दिग्दर्शक हनी त्रेहान, डब्ल्यूआयएफपीएचे अध्यक्ष संग्राम शिर्के, ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहाता, फिल्म मेकर्स कंबाइनचे सरचिटणीस धरम मेहरा, प्रोड्युसर गिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन तेज अहुजा, निर्माता पेहलाज निहलानी, विक्रम खक्खर, दिग्दर्शक दीपक तिजोरी, परावल रमन आणि इतर काही मंडळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

३८ सिनेमांना २१ कोटींचे अनुदान

उत्तर प्रदेशात फिल्म सिटी निर्माण वेगाने सुरू व्हावे यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी सरकारतर्फे सिनेनिर्मितीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मागील तीन वर्षांत ३८ हून अधिक सिनेमांना अनुदान देण्यात आले आहे.

राज्यात दरवर्षी सिनेनिर्मितीसाठी १५० ते २०० कोटी देण्यात येतात. सध्या, १.५ कोटी ते ५० कोटी रुपयांमध्ये अनेक सिनेमे तयार होत आहेत. योगी सरकारने २०१७ पासून ३८ सिनेमांना सुमारे २१ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. ‘रेड’ आणि ‘आर्टिकल १५’ सारख्या लोकप्रिय सिनेमांना उत्तर प्रदेश सरकारने अनुदान दिले आहे.

आणखी २२ सिनेमांसाठी स्क्रिप्ट मंजूर

यूपी फिल्म बंधू कमिटीने उत्तर सरकारच्या वतीने २२ सिनेमांच्या पटकथेला मंजुरी दिली आहे. याशिवाय, इतर २० प्रादेशिक सिनेमांच्या पटकथाही मंजूर झाल्या आहेत. स्वरा भास्कर यांच्या ‘नील बट्टे सन्नाटा’ या सिनेमासाठी ६५ लाख तर नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या बाबू मोशाय बंदुकबाज या सिनेमासाठी ६० लाख रुपयेही उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत.

उत्तर प्रदेशात सिनेमा बनवण्याचे फायदे

नव्या फिल्म धोरणानुसार राज्यात सिनेमाचे चित्रिकरण करण्यासाठी सरकार दोन कोटी रुपयांपर्यंत साह्य करणार आहे. राज्यात हिंदी किंवा इतर भाषेत बनवणाऱ्या सिनेमासाठी २५ टक्के किंवा कमाल दोन कोटी आणि प्रादेशिक भाषेतील सिनेमासाठी ५० टक्के अशी तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील पाच कलाकार सिनेमात असल्यास अतिरिक्त २५  लाख आणि सर्व कलाकार राज्यातील असल्यास अतिरिक्त ५०  लाख देण्याचीही तरतूद आहे. पर्यटन विभागाच्या जागांवरही २५ टक्के सूट दिली जाईल.