अनुष्काने शेअर केला वडिलांसोबतचा वामिकाचा खास फोटो, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

“माझे वडील आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहोत. आम्ही मोठे होत असताना प्रामाणिकपणा, चांगुलपणा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करा असे त्यांनी आम्हाला शिकवले.

  अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील निवृत्त कर्नल अजय शर्मा यांचा ६० वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यात अनुष्काने अनेक फोटो शेअर केले होते. त्यातील एका फोटोत विराट आणि अनुष्काची मुलगी वामिकाही  आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने अनेक फोटो शेअर केले आहेत. भारतीय सैन्यातील तिच्या वडिलांचे दिवस, छोट्या अनुष्का सोबतचा फोटो, विराट आणि अनुष्काच्या लग्नातील फोटो आणि सगळ्यात खास फोटो म्हणजे वामिका सोबतचा फोटो अनुष्काने शेअर केला आहे. या फोटोत अजय शर्मा हे वामिकाला हातात घेऊन फिरवत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  अनुष्का लिहीते…

  “माझे वडील आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहोत. आम्ही मोठे होत असताना प्रामाणिकपणा, चांगुलपणा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करा असे त्यांनी आम्हाला शिकवले. मला त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा मिळाली. त्यांनी मला जेवढा पाठिंबा दिला आहे त्याची मी परतफेड करू शकणार नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. तुम्हाला ६० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.”