‘वाह भाभीजी वाह’ युजवेंद्र चहलची बायको धनश्रीचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हायरल!

डान्सचा हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘या अशांत वातावरणात ट्रेंड कायम ठेवा. तसेच या गाण्यावर डान्स करताना मी एक रिल पोस्ट करणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

    भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने डान्सर धनश्री वर्मासोबत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले. धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. पण काही दिवसांपूर्वी चहलच्या आई-वडिलांना कोरोना झाल्यामुळे धनश्री सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. आता धनश्री पुन्हा सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.

    नुकताच धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती डान्स करताना दिसत आहे. डान्सचा हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘या अशांत वातावरणात ट्रेंड कायम ठेवा. तसेच या गाण्यावर डान्स करताना मी एक रिल पोस्ट करणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

    धनश्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा डान्सपाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘मी तुझ्या डान्सचा फॅन आहे’ असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका यूजरने ‘वाह भाभीजी वाह’ असे म्हटले आहे.