gohar khan

बिग बॉस ७ ची विजेती गौहर खान आणि झैद दरबारशी लवकरच लग्न करणार आहे. ६ दिवसानंतर या दोघांच लग्न आहे. लग्नाआधी या दोघांच्या लग्नाची हटके वेडिंग इन्व्हिटेशन समोर आलं आहे. डिसेंबर रोजी त्यांचं लग्न होणार आहे. त्यांनी लग्नाचं आमंत्रण करणारा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हटके लग्नपत्रिका

गौहर खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक छानसा व्हिडिओ शेअर केला आहे. याला ‘जब वी मेट’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमधून त्यांची मैत्री, एकमेकांना केलेलं प्रपोज आणि त्यानंतर त्यांच्यात खुललेलं प्रेम दाखवण्यात आलं आहे. २५  डिसेंबर २०२० ला निकाह होणार आहे असंही शेवटी यात दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओला काही वेळातच  हजारो लाइक्स मिळाले.

मुंबईल्या एका बड्या हॉटेलमध्ये झैद आणि गौहरचा निकाह होणार आहे. झैद दरबार हे नाव देखील सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर असणारा झैदचे देखील लाखो फॉलोअर्स आहे. बिग बॉस 7 ची विजेती राहिलेली अभिनेत्री गौहर खान म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या होत्या. आता या कलाकारांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

झैदने सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं टिकलं नाही.