देवमाणसानेही घेतली कोरोनाची लस, फोटोचं कॅप्शन वाचून चाहते म्हणाले…

 नुकताच अभिनेता किरण गायकवाडने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तो कोरोना लसीकरण करत असल्याचं दिसत आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातलं होतं. सध्या परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाची लससुद्धा हळूहळू उपलब्ध होऊ लागली आहे. सर्वसामन्य लोकांप्रमाणे कलाकारही लसीकरण करून घेत आहेत. नुकताच आज देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडनेसुद्धा लस टोचून घेतली आहे. सोशल मीडियावरून त्याने याबद्दलची माहिती देत जनहिताचा संदेशसुद्धा दिला आहे.

    नुकताच अभिनेता किरण गायकवाडने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तो कोरोना लसीकरण करत असल्याचं दिसत आहे. आज किरणने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. आणि त्याचा फोटो शेयर करत त्याने एक महत्वाचा संदेशदेखील दिला आहे, किरणने फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘आपण किती जरी मॅनेज करायचा प्रयत्न केला,तरी कोरोना मॅनेज करू देणार नाही, म्हणून आज लस घेतली,…तुम्हीही घ्या’. फोटोचं कॅप्शन पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. तर काही चाहते त्याला काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा करत आहेत.

    डॉ. अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. खलनायकाची भूमिका असूनदेखील दर्शकांनी त्याला एखाद्या अभिनेत्याप्रमाणे प्रेम दिलं आहे.