डॉ. अजितकुमारच्या खटल्याची कोर्टाची तारीख, आता होणार नव्या खेळीला सुरूवात!

 डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख पडलेय, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. 

    एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘किरण गायकवाड’ याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिकली आहेत.

     भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये, ह्या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत ह्यासाठी तो डिम्पल ची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ACP दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं सांगते. 
     
    ह्यातच डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख पडलेय, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वतच लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औसुक्याचा ठरणार आहे. 
     
    तेव्हा पाहायला विसरु नका डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टकेस ‘देवमाणूस’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर