‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा येणार सिक्वल, ‘ही’ मराठी अभिनेत्री दिसणार शनायाच्या भूमिकेत!

रविवारी ७ मार्च रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतील मुख्य पात्र गुरुनाथ हा काही सुधरला नाही. मालिकेच्या शेवटच्या भागात गुरुनाथ हा श्रुती मराठेच्या बॅगा उचलताना दिसला आहे.

  लवकरच झी मराठीवर रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भाग सुरू होणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या झी मराठीवर जोरदार सुरू आहेत. या मालिकेसोबतच झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या मालिकेचाही सिक्वेल येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

   

  या मालिकेतील एक एक पात्र हे घराघरात पोहोचले होते. गुरुनाथ, शनाया, राधिका ही नावे प्रत्येक घराघरात पोहोचली. ‘पती पत्नी और वो’ हा धागा धरुन सुरु झालेली ही मालिका अनेक रंजक वळणे घेत रगंवली गेली. तब्बल साडेचार वर्षे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

  रविवारी ७ मार्च रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतील मुख्य पात्र गुरुनाथ हा काही सुधरला नाही. मालिकेच्या शेवटच्या भागात गुरुनाथ हा श्रुती मराठेच्या बॅगा उचलताना दिसला आहे. त्यामुळे श्रुती मराठेच्या एन्ट्रीने या मालिकेच्या सिक्वलची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही बंद करावी यासाठी प्रेक्षकांनी खूप प्रतिक्रीया दिल्या होत्या. अखेर या मालिकेला निरोप देण्यात आला. त्यामुळे यया मलिकेचा सिक्वल प्रेक्षक स्विकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. झी मराठी ने या आधी ‘जागो मोहन प्यारे’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांचे सिक्वल प्रदर्शीत केले आहेत.