L’il champs पुन्हा येणार, पल्लवी जोशी नाही तर ही अभिनेत्री सांभाळणार सुत्रसंचालनाची जबाबदारी!

झी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात काही लहान मुले दिसत आहेत. तर एक मुलगी गाणं गात आहेत. सा रे ग म प l'il champs चं हे तिसरं पर्व आहे. येत्या २९ एप्रिल पासून शो सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

    झी मराठी वाहिनी वर काही वर्षापूर्वी लोकप्रिय झालेला रियॅलिटी शो सा रे ग म प लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर या कार्यक्रमाने श्रोत्यांची चांगलीचं मने जिंकली होती. रोहित राऊत , कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या मंडळींनी हे पर्व खूप गाजवेललं. तर हाच कार्यक्रम आता पुन्हा एकदा सुरू होत आहे.

    झी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात काही लहान मुले दिसत आहेत. तर एक मुलगी गाणं गात आहेत. सा रे ग म प l’il champs चं हे तिसरं पर्व आहे. येत्या २९ एप्रिल पासून शो सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

    लिटील चॅम्सच बनणार जज

    मागील पर्वांत गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांनी जज ची भूमिका पार पाडली होती. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी ने सूत्रसंचालन केलं होतं. तर या पर्वात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालनाची धूरा सांभाळणार आहे. तर हे ५ लिटील चॅम्स जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.