देव माणूस मालिकेत ट्विस्ट, बायकांना फसवणाऱ्या डॉक्टराला पकडण्यासाठी पोलिसांनी आखला ‘हा’ प्लॅन!

आरोपीला पकडण्यासाठी एसीपीनं विविध प्रकारचे प्रयत्न केले. परंतु ती त्याला पकडण्यात अपयशी ठरली. इतकंच काय तर तिनं केस सोडून द्यावी यासाठी त्यानं तिच्या मुलीचं देखील अपहरण केलं होतं.

  देव माणूस ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक. देवी सिंग नावाचा एक आरोपी आपली विकृत कृत्य साध्य करण्यासाठी महिलांच्या हत्या करतो. यावर ही मालिका आधारित आहे. तो सध्या एका गावात डॉक्टरचा वेश परिधान करुन लोकांना फसवत आहे. अन् या सिंगला पकडण्यासाठी एसीपी विद्या आता त्या गावात आली आहे.

  आरोपीला पकडण्यासाठी एसीपीनं विविध प्रकारचे प्रयत्न केले. परंतु ती त्याला पकडण्यात अपयशी ठरली. इतकंच काय तर तिनं केस सोडून द्यावी यासाठी त्यानं तिच्या मुलीचं देखील अपहरण केलं होतं. परंतु तरीही एसीपीनं मात्र हार मानलेली नाही. तिनं त्याला पकडण्यासाठी आता एक वेगळाच सापळा रचला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

   

  असा असेल प्लॅन

  देवी सिंग एका महिलेला घेऊन हॉटेलमध्ये गेला होता. त्या हॉटेलच्या मालकानं त्याला पाहिलं होतं. एसीपीनं हॉटेल मालकावर नजर ठेवण्यासाठी काही पोलीस तैनात केले आहेत. देवी सिंग त्या मालकाला मारण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी पकडता येईल असा अंदाज एसीपीनं लावला आहे. अर्थात यामध्ये ती यशस्वी हील का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.